Price: ₹ 295.00
(as of Jul 22, 2021 14:36:26 UTC – Details)
आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषा-शैली असणाऱ्या पुस्तकात शिकायला मिळेल. <Br> आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकात काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत. या सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते.
‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकात तुम्हाला समजेल. तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची!
या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल: आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!.
From the Publisher
30 DAYS : Change Your Habits, Change Your Life
काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही. याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का? आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का? आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार?
आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत. या सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते.
‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल. तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची!
या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल : आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!
तुमची कहाणी नव्यानं लिहा
‘प्रत्येक परिस्थितीकडे, प्रसंगाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन बदला. मला खात्री आहे, तुम्ही बदलेल्या नव्या जगात प्रवेश कराल.’
-वेन डब्ल्यू. डायर
वर उद्धृत केलेली कल्पना मला पहिल्यांदा समजली, ती सुमारे 25 वर्षांपूर्वी. ‘सेठ स्पीक्स’ हे जेन रॉबर्ट्सचं पुस्तक वाचताना ही संकल्पना माझ्या लक्षात आली. सेठ म्हणतात, ‘‘तुमच्या आयुष्याच्या कहाणीचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख पात्र तुम्ही स्वत:च आहात.’’ त्यामुळे तुमच्या मनाजोगती ही कहाणी रंगत नसेल तर चक्क ती बदलून टाका! त्यावेळी मला वाटलं की, ‘अरे, ही एक आश्वासक कल्पना दिसते.’ मग मी ती एकदा आचरणात आणली आणि त्यानंतर ती संकल्पना माझ्या आयुष्याचाच भाग बनून गेली – चांगल्या काळात तसंच वाईट काळातही. ‘‘तुमच्या भूतकाळात काय घडलं, याला आता काही महत्त्व नाही. तुमचा भविष्यकाळ हे एक कोरं पान आहे.’’ तुम्हाला जे हवं ते त्यावर लिहा. स्वत:ला नव्यानं घडवा. प्रत्येक दिवस एक नवं आयुष्य घडवण्याची संधी घेऊन येत असतो! तुम्ही हर एक क्षणाला तुमच्या ‘स्व’ला नव्यानं शोधू आणि घडवू शकता. मग तुम्ही कोण होणार? या दिवसापासून आपण कोण, कसं व्हायचं ते निवडणं तुमच्या हातात आहे. मग काय ठरवलंत तुम्ही?
या पुस्तकात सुचवलेल्या काही गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष आचरणात आणल्या, नवीन सवयी रुजवल्या आणि यात दिलेल्या अनेक स्वाध्यायांपैकी काही नेमानं करायला सुरुवात केलीत, तर बदल घडायला सुरुवात होईल. ‘‘अर्थात हे काही खूप सोपं नाही. यासाठी तुमच्यामध्ये शिस्त, संयम आणि सातत्य असण्याची आत्यंतिक गरज आहे; पण सुपरिणाम दिसतील, अगदी नक्की दिसतील.’’
2008 मध्ये एफ. सी. बार्सेलोना या फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक जोसेफ ‘पेप’ गार्डिओला यांनी एका अगदी नाउमेद झालेल्या संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रं हाती घेतली. यासाठी एका भव्य क्रीडांगणावर त्यांनी एक कार्यक्रम घेतला, त्याला सुमारे 73 हजार लोक प्रत्यक्ष उपस्थित होते आणि लाखो लोक कॅटालोनियाच्या टीव्हीच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघत होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी त्यांनी जे भाषण केलं, ते अगदी प्रामाणिक, पारदर्शी आणि उमेद वाढवणारं होतं. ते म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला काही मोठं अजिंक्यपद मिळवून देण्याचं वचन देऊ शकत नाही. मात्र आम्ही तुम्हाला प्रयत्न करत राहण्याचं, सतत-सतत-सतत अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहण्याचं वचन देऊ शकतो. चला आपापले सीटबेल्ट्स बांधून घ्या आणि आनंद लुटायला सज्ज व्हा!’’ या भाषणाने या क्लबच्या 115 वर्षांच्या इतिहासातला सर्वांत यशस्वी कालखंड सुरू झाला. असा कालखंड पुन्हा कधी येणार नाही असंही काही लोकांना वाटतं. या भाषणाचा जबरदस्त परिणाम दिसून आला. या संघानं तीन राष्ट्रीय अजिंक्यपदं, दोन राष्ट्रीय चषक, तीन स्पॅनिश सुपरकप, दोन युरोपियन सुपरकप, दोन चँपियन लीग आणि दोन जागतिक क्लब अजिंक्यपदं पटकावली. पुढची चार वर्षं या संघानं जागतिक फूटबॉलच्या विश्वात आपला दबदबा कायम राखला. (हे म्हणजे मध्यम दर्जाच्या एखाद्या जिल्हा क्रिकेट संघानं सलग चार-पाच जागतिक स्तरावरचे सामने जिंकण्यासारखं झालं!)
त्यांनी आपली गोष्ट नव्यानं लिहिली. आता तुमची वेळ आली आहे. प्रयत्न सुरू करा आणि चिकाटीने, सतत, अखंड प्रयत्नशील राहा! हार मानू नका! चला आपापले सीटबेल्ट्स बांधून घ्या आणि आयुष्याचा आनंद लुटायला सज्ज व्हा!
मार्क रेक्लाऊ
मार्क रेक्लाऊ हे एक प्रशिक्षक, व्याख्याते आणि लोकप्रिय लेखक आहेत. लोकांना त्यांचं इच्छित जीवन जगण्याइतकं सक्षम करणं आणि त्यासाठी आवश्यक ते सगळे मार्गदर्शन, शिकवण त्यांना उपलब्ध करून देणं हे मार्क यांच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यांचा संदेश सोपा आहे: पुष्कळ लोकांना आयुष्याची फत सुधारण्याची इच्छा असते; पण त्यासाठी सातत्यानं दीर्घकाळापर्यंत काही विशिष्ट स्वाध्याय करावे लागतात, त्याला त्यांची तयारी नसते. तुमच्या ध्येयाच्या मार्गावर चालण्यासाठी मदत करतील, अशा काही उपयुक्त सवयी अंगी बाणवून घेऊन योजनापूर्वक पद्धतीनं तुम्ही आयुष्यात आनंद आणि यश निर्माण करू शकता. मार्क यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही ‘www.marcreklau.com’ या संकेतस्थळावर त्यांच्याशी थेट संपर्क करू शकता, इथे तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक माहितीही मिळेल. तुम्ही त्यांच्याशी ट्विटर वरूनही @MarcReklau संपर्क साधू शकता. फेसबुक किंवा www.goodhabitsacademy.com या संकेतस्थळावरही तुम्ही मार्क यांच्याशी संपर्क करू शकता.
Publisher:Saket Prakashan Pvt Ltd; First edition (15 March 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language:Marathi
Paperback:248 pages
ISBN-10:9352203100
ISBN-13:978-9352203109
Item Weight:220 g
Dimensions:20.8 x 13.8 x 1.2 cm
Country of Origin:India
Importer:Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer:Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name:Marathi Book