Share It


Price: ₹70.00
(as of Aug 02, 2021 09:16:32 UTC – Details)


पोषणविषयक जाणीवजागृती समाजातील सर्व स्तरांमध्ये सर्व वयाच्या, भिन्न आर्थिक स्तर असलेल्या लोकांमध्ये निर्माण करायला हवी. आपल्याजवळ जे काय उपलब्ध आहे त्यातून सकस आणि पौष्टिक अन्न कसे मिळवता येईल? त्यातून सर्व वयोगटांच्या लोकांना त्यांच्या जीवनविषयक गरजा भागतील असा संतुलित आहार कसा देता येईल, याचे शिक्षण घेणे अत्यावश्यक झाले आहे. ‘पाळणा ते काठी’ या सर्व अवस्थांसाठी एकाच वेळी समतोल आहार देणं अक्षरक्षः तारेवरची कसरत असते. खऱ्या अर्थानं ती एक कलाच असते; मग या कलेला आत्मसात करण्यासाठी आहारशास्त्राची ओळख करून घेणं, मैत्री वाढवणं महत्त्वाचं ठरतं. एकदा ही ओळख झाली, की मग समतोल आहाराचं आयोजन सुकर होतं. आहारात विविधता आणि आकर्षकता आणण्यासाठी पदार्थांचा पोत, रंग, चव. शिजवण्याच्या पद्धती यांचा कल्पकतेने वापर करावा. त्यामुळे पदार्थ खाण्याचे स्वप्न पूर्ण होते आणि शरीराच्या सर्व गरजाही भागविल्या जातात. पौष्टिकता आपल्या खिशाला परवडणारी असावी आणि तशी ती मिळवता येते. त्यासाठी फक्त आहाराकडे डोळसपणे बघणे जरुरीचे ठरते. ऋतुमानानुसार आणि उपलब्धतेनुसार आहारातील पदार्थांचे नियोजन कसे करावे? तसेच वाढदिवस, सहली, सुटी, घरगुती सण-समारंभ इत्यादी प्रसंगी त्यात कसे आणि काय बदल करावेत? दुपारी जड जेवण झाल्यास रात्रीचा आहार हलका घेऊन समन्वय कसा साधावा? याचे शास्त्र आणि आहार म्हणजे फक्त पोटाचा किंवा जिभेचा विचार नसतो तर त्याकडे जागरूकतेने आणि डोळसपणे बघावे लागते, हे सहज समजावून सांगणारे उपयुक्त पुस्तक.

Publisher‏:‎Saket Prakashan Pvt Ltd; Fourth edition (1 January 2015); Saket Prakashan Pvt Ltd
Language‏:‎Marathi
Paperback‏:‎104 pages
ISBN-10‏:‎8177865412
ISBN-13‏:‎978-8177865417
Item Weight‏:‎200 g
Dimensions‏:‎20.8 x 13.8 x 0.6 cm
Country of Origin‏:‎India
Importer‏:‎Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer‏:‎Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Generic Name‏:‎Marathi Book