Price: ₹202.00
(as of Jul 24, 2021 02:57:27 UTC – Details)
From the Publisher
Sarvotrkushta Bananyache Super Powerful Mantra by John L. Mason
आपल्यावर दररोज मर्यादा घातल्या जातात. प्रत्येक दिवशी त्यांना स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय आपल्याकडे असतो. तुम्ही जे होऊ शकता त्यापासून तुम्हाला मागे रोखून ठेवणाऱ्या मर्यादांवर हल्ला करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. मला असे वाटते की, आपल्यापैकी प्रत्येकाला एका उद्देशाने आणि किंवा एका उद्देशासाठी घडवले आहे आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण ‘‘आपल्याला मागे रोखून धरणारा खुंटा ओढून’’ पळायला हवे.
इच्छा ही बी लावण्यासारखी आहे. त्यामुळे काही गोष्टींची आणि त्या गोष्टी वाढण्यास सुरुवात होते. सखोल किंवा तीव्र इच्छाशक्ती स्वत:साठी फक्त संधीच निर्माण करते असे नाही, तर ती आपल्यात बुद्धिमत्ता किंवा विशेष कौशल्य निर्माण करते; तसेच योग्य दृष्टिकोनामुळे आपल्या क्षमता बदलतात.
तुम्ही जे करता ते हसऱ्या चेहऱ्याने करा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे मूल्य वाढते. जेव्हा तुमचा उत्साह वाढतो तेव्हा तुमच्या आयुष्यातील ताण आणि भय नाहीसे होते; कारण झपाटलेपणात खूप शक्ती असते.
तुमच्यातील तीव्र इच्छाशक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजेच तुमच्या उज्ज्वल भविष्यावर विश्वास ठेवणे होय. फक्त डोळ्यांना जेवढे दिसते, तेवढेच अस्तित्वात असते, हे खरे नाही. (टेरेन्स डील) तुम्ही जी गोष्ट करता त्यावर प्रेम करा, त्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या, अधिक मोठ्या गोष्टी करत राहाल.
‘‘जॉन मेसनच्या पुस्तकातील सत्याची सामर्थ्यशाली मौक्तिके आत्म्याच्या राजहंसासाठी उत्कृष्ट खाद्य आहे. मर्यादित विचारसरणीच्या बाटलीचे झाकण उघडून अमर्याद आनंदाची आणि यशाची तुमची स्वत:ची पाकरचना बनवायला सज्ज व्हा.’’
– मार्क व्हिक्टर हॅन्सेन
चिकन सूप फॉर द सोलचे सहलेखक
वाढत्या स्पर्धात्मक युगात सर्वांनाच सर्वोत्कृष्ट बनायचे आहे. त्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे, आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. तुम्हालाही सर्वोत्कृष्ट बनायचे आहे का? मग जॉन मेसन यांचे ‘सर्वोत्कृष्ट बनण्याचे सुपर पॉवरफुल मंत्र’ हे पुस्तक जरूर वाचा. ते तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखून त्यावर विजय मिळविण्यासाठी मार्गदर्शन करील. मेसन यांनी या पुस्तकात सांगितलेले 101 विचाररत्न तुम्हाला अडचणींवर विजय मिळवायला, आयुष्यात नवी उंची गाठायला, तुमचे स्वप्न प्रत्यक्ष साकारायला अर्थात सर्वोत्कृष्ट बनण्यास निश्चित मदत करतील.
हे पुस्तक तुम्हाला…
तुम्ही जे आहात तेच असण्याचे धाडस ठेवायला शिकवेल.
नेहमी हसायला आणि रागाला विश्रांती द्यायला शिकवेल.
तुम्ही पाहू शकता त्यापेक्षा पुढे जायला शिकवेल.
संधीचे सोने करायला शिकवेल.
तुम्ही जितके वेळ खाली पडाल त्यापेक्षा एक वेळा अधिक उठायला शिकवेल.
हे आणि असेच आणखी ९६विचाररत्न या पुस्तकात आहेत. हे विचाररत्न तुम्ही अंगीकारल्यास तुम्हीही अमर्याद यश आणि आनंद मिळवू शकता.
Publisher:Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 January 2014)
Language:Marathi
Paperback:216 pages
ISBN-10:8177869337
ISBN-13:978-8177869330
Item Weight:230 g
Dimensions:14 x 14 x 21 cm
Country of Origin:India